<b> ‘कॅट’चा निकाल जाहीर! </B>

देशातील प्रमुख मॅनेजमेंट संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी गरजेची असलेल्या कॉमन अॅडमिशन टेस्ट म्हणजेच ‘कॅट’चे निकाल मंगळवारी जाहीर झालेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 14, 2014, 04:09 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
देशातील प्रमुख मॅनेजमेंट संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी गरजेची असलेल्या कॉमन अॅडमिशन टेस्ट म्हणजेच ‘कॅट’चे निकाल मंगळवारी जाहीर झालेत.
कॅटचे संयोजक रोहित कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, निकाल ‘कॅट’च्या अधिकृत वेबसाईटवर ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत उपलब्ध असतील. याचसोबत परिक्षार्थिंना आपली गुणपत्रिका सुरक्षित ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिलाय.
कॅट २०१३ परीक्षा १६ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर २०१३ दरम्यान देशातील तब्बल ४० शहरांमधल्या ७६ केंद्रांवर पार पडली होती. देशातील १३ भारतीय मॅनेजमेंट संस्थांसोबतच (आयआयएम) आणि इतर अन्य मॅनेजमेंट संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक ही परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.