दिल्लीमध्ये भीषण अपघाताची दृश्ये सीसीटीव्हीत कैद

नवी दिल्लीत एका भरधाव वेगाने जाणाऱ्या मर्सिडीजने उडवल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडलीये. या भीषण अपघाताची दृश्ये सीसीटीव्हीत कैद झालीये.

Updated: Apr 7, 2016, 10:06 AM IST
दिल्लीमध्ये भीषण अपघाताची दृश्ये सीसीटीव्हीत कैद title=

नवी दिल्ली : नवी दिल्लीत एका भरधाव वेगाने जाणाऱ्या मर्सिडीजने उडवल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडलीये. या भीषण अपघाताची दृश्ये सीसीटीव्हीत कैद झालीये.

दिल्लीच्या सिव्हिल लाईन्स परिसरात ही घटना घडली. सिद्धार्थ शर्मा असं त्या मृत तरुणाचे नाव आहे. रस्ता पार करत असताना समोरुन भरधाव येणाऱ्या मर्सिडीजने त्याला उडवले. यात सिद्धार्थचा मृत्यू झाला. 

पोलिसांच्या माहितीनुसार, मर्सिडीज १२ वीतला विद्यार्थी चालवत होता. तो मित्रांसोबत गाडीत सेलिब्रेशन करत होता. पोलिसांनी या घटनेनंतर त्या विद्यार्थ्याला अटक केली मात्र त्यानंतर जामिनावर त्याची सुटका करण्यात आली. 

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाला तेव्हा गाडीत आठ लोक होते. तब्बल १००च्या स्पीडने ही कार रस्त्यावर धावत होती. या गाडीची सिद्धार्थला इतकी जोरात धडक बसली की तो बऱ्याच लांब फेकला गेला.