बँकेत कॅश व्यवहारांवर लागणार आता अधिक शुल्क

नोटबंदीनंतर सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेला कॅशलेस बनवण्याचा प्रयत्न करते आहे. बँकांनीही यावर सरकारची साथ देण्याचं मन बनवलेलं दिसतंय. एचडीएफसी बँकेने कॅशलेस ट्रांजेक्‍शनला प्रोत्साहन देण्यासाठी रोख रक्कम काढल्यास त्यावर शुल्‍क आकारण्यात येणार आहे.

Updated: Feb 6, 2017, 03:05 PM IST
बँकेत कॅश व्यवहारांवर लागणार आता अधिक शुल्क title=

मुंबई : नोटबंदीनंतर सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेला कॅशलेस बनवण्याचा प्रयत्न करते आहे. बँकांनीही यावर सरकारची साथ देण्याचं मन बनवलेलं दिसतंय. एचडीएफसी बँकेने कॅशलेस ट्रांजेक्‍शनला प्रोत्साहन देण्यासाठी रोख रक्कम काढल्यास त्यावर शुल्‍क आकारण्यात येणार आहे.

HDFC बँकेने 4 पेक्षा अधिक वेळा रोख रक्कम काढल्यास त्यावर 150 रुपये अधिक शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार नोटबंदीनंतर लोकांना डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहीत करत आहे. त्यामुळे बँकेने हे पाऊल उचललं आहे.

बँकेने म्हटलं आहे की, 1 मार्चपासून काही ट्रांजेक्शनवर शुल्क वाढवण्यात येईल.

काही गोष्टींवर रोख रक्कमेवर सीमा ठेवण्यात येणार आहे. काही व्यवहारांवर अधिक शुल्क आकारण्यात येणार आहे.

थर्ड पार्टी ट्रांजेक्शनवर प्रती दिवशी 25,000 रुपयांची मर्यादा घालण्यात आली आहे.

फ्री ट्रांजेक्शनची संख्या पाच वरुन 4 करण्यात आली आहे. तर नॉन-फ्री ट्रांजेक्शनवर 50 टक्के शुल्क वाढवण्यात आले आहे.

दिवसाला फक्त 50000 रोख रुपये ट्रान्सफर करता येणार आहे. नवीन शुल्क आकारणी पॉलिसी फक्त सॅलरी आणि सेविंग अकाउंटसाठी लागू करण्यात आली आहे.

होम ब्रांचमध्येही फ्री कॅश ट्रांजेक्शनची मर्यादा दो लाख रुपये करण्यात आली आहे. याच्यावर ग्राहकांना 150 ते 5000 रुपये शुल्क लागणार आहे.

आयसीआयसीआय आणि अॅक्सिस बँकेनेही 4 पेक्षा अधिक ट्रांजेक्शनवर 150 रुपये चार्ज आकारण्याचा निर्णय घेतला आहे.