चेन्नईत 11 मजली इमारत कोसळली

 चेन्नईमध्ये आज संध्याकाळी 11 मजली इमारत कोसळली. या अपघातात एक ठार झाला असून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. जेमिनी फ्लायओव्हर जवळच्या भागात हा अपघात घडला.

PTI | Updated: Jun 28, 2014, 11:42 PM IST
चेन्नईत 11 मजली इमारत कोसळली title=

चेन्नई : चेन्नईमध्ये आज संध्याकाळी 11 मजली इमारत कोसळली. या अपघातात एक ठार झाला असून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. जेमिनी फ्लायओव्हर जवळच्या भागात हा अपघात घडला.

या इमारतीचं काम सुरु असताना हा अपघात घडला. या इमारतीच्या ढिगा-याखाली 50 जण दबले असल्याची भीती व्यक्त करण्यात येतीय.बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं असून ढिगारा उपसण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.

यापूर्वी दिल्लीमध्ये इंद्रलोक परिसरात 4 मजली इमारत कोसळल्यानं 10 जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये पाच मुले आणि तीन महिलांचा समावेश आहे.

ही इमारत 50 वर्ष जुनी होती, अशी माहिती आहे.या इमारतीच्या शेजारी बांधकाम सुरु होतं, त्यामुळे ही इमारत कोसळली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.