यादवांच्या वादात काँग्रेसनं घेतली उडी

उत्तर प्रदेशातल्या यादवांच्या वादात आता काँग्रेसनंही उडी घेतलीय. अखिलेश सरकारच्या मदताली काँग्रेस धावून आली आहे. उत्तर प्रदेशातलं अखिलेश सरकार संकटात असेल तर मदत करणार असल्याची भूमिका काँग्रेसनं घेतलीय. 

Updated: Oct 24, 2016, 03:44 PM IST
यादवांच्या वादात काँग्रेसनं घेतली उडी title=

लखनऊ : उत्तर प्रदेशातल्या यादवांच्या वादात आता काँग्रेसनंही उडी घेतलीय. अखिलेश सरकारच्या मदताली काँग्रेस धावून आली आहे. उत्तर प्रदेशातलं अखिलेश सरकार संकटात असेल तर मदत करणार असल्याची भूमिका काँग्रेसनं घेतलीय. 

काँग्रेस प्रवक्ते आरपीएन सिंह यांनी ही माहिती दिलीय. अखिलेश सरकारला सर्वतोपरी मदत करणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. 

समाजवादी पक्षात सध्या वाद सुरु आहेत. अखिलेश कुमार आणि काही वरिष्ठ नेत्यांमध्ये जमत नसल्याने पक्ष तुटण्याच्या मार्गावर आला आहे. याबाबतच आज सकाळी मुलायम सिंह यादव यांनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली.