श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती निवळत असताना संपूर्ण काश्मीर खोऱ्यातून आज संचारबंदी मागे घेण्यात आल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
संचारबंदी उठवण्यात आली असली तरी काश्मीर खो-यातील जनजीवन अद्याप विस्कळीत झालेले आहे. त्यामुळे राज्यभर जमावबंदी मात्र कायम ठेवण्यात आली आहे.
जुलैमध्ये दहशतवादी बुऱ्हाण वणी यांच्या हत्येनंतर राज्यात मोठा हिंसाचार उसळला होता. तेव्हापासून काश्मीरमधील अनेक शहरांत संचारबंदी लागू करण्यात आली होती.