अबब! 125 फूट लांब भुयार खोदून बँकेवर दरोडा

 सोनिपत जिल्ह्यातील गोहाना इथं दरोडेखोरांनी 125 फूट लांब भुयार खोदून थेट पंजाब नॅशनल बँकेच्या स्ट्राँगरूममध्ये प्रवेश मिळवत कोटय़वधीच्या रोख रकमेवर डल्ला मारला. ‘धूम-1’ स्टाईलच्या या दरोडय़ानं पोलीस यंत्रणा हादरून गेली आहे. लुटीची नेमकी रक्कम उघड झाल्यानंतर देशातील हा सर्वात मोठा दरोडा ठरण्याची शक्यता आहे.

PTI | Updated: Oct 28, 2014, 06:53 PM IST
अबब! 125 फूट लांब भुयार खोदून बँकेवर दरोडा title=

रोहतक, हरियाणा:  सोनिपत जिल्ह्यातील गोहाना इथं दरोडेखोरांनी 125 फूट लांब भुयार खोदून थेट पंजाब नॅशनल बँकेच्या स्ट्राँगरूममध्ये प्रवेश मिळवत कोटय़वधीच्या रोख रकमेवर डल्ला मारला. ‘धूम-1’ स्टाईलच्या या दरोडय़ानं पोलीस यंत्रणा हादरून गेली आहे. लुटीची नेमकी रक्कम उघड झाल्यानंतर देशातील हा सर्वात मोठा दरोडा ठरण्याची शक्यता आहे.

सोमवारी दरोडा उघडकीस आला असला तरी दरोडेखोरांनी शनिवारी रात्रीपासून सोमवारी पहाटेर्पयत चोरीची मोहीम फत्ते केली असावी, असा पोलिसांचा कयास आहे. स्ट्राँगरूममधील 360 पैकी 90 लॉकर्स चोरटय़ांनी फोडल्याची माहिती बँकेचे व्यवस्थापक देविंदर मलिक यांनी दिली. हरियाणाच्या सोनिपत जिल्ह्यातील गोहाना हे गाव चंदीगडपासून 200 कि.मी. अंतरावर आहे. 2007 मध्ये केरळमधील एका बँकेत अशी धाडसी चोरी झाली होती.

गोहानातील जुन्या बसस्थानकाजवळील पंजाब नॅशनल बँकेला लागून असलेल्या इमारतीतून चोरटय़ांनी 2.5 फूट रुंदीचा भुयारी मार्ग खोदला होता. शनिवारी बँक बंद झाल्यानंतर रात्री चोरटय़ांनी शेजारच्या इमारतीतून भुयार खोदण्यास सुरुवात केली. इमारतीतील दोन खोल्यांमध्ये भुयारातील माती टाकली. खोलीच्या खिडक्या कागदांनी झाकल्यामुळे आत काय सुरू आहे, हे कोणालाही कळले नाही. कदाचित हे भुयार खोदण्यासाठी महिना लागला असावा. त्यासाठी बऱ्याच काळापासून नियोजन केलं असावं, असा कयास आहे. 

सीसीटीव्ही फुटेजची पाहणी

गेल्या काही दिवसांमध्ये बँकेत काही लोकांच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्या काय, हे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासलं जात असल्याचं गोहानाचे पोलीस उप-अधिक्षक राजीव देशवाल यांनी सांगितलं. मात्र स्ट्राँगरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. बँक लुटण्यात आल्याच्या बातमीनं या परिसरात खळबळ उडाली असून लोकांनी बँकेसमोर दिवसभर गर्दी केली होती.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.