ज्या कोर्टात वडील चहा विकतात, त्याच कोर्टात मुलगी बनली 'न्यायाधीश'!

आपण ज्या न्यायालयासमोर जिथे चहा विकतो त्याच न्यायालयात आपल्या मुलीला न्यायाधीश म्हणून पाहणं एखाद्या बापाला किती अभिमानास्पद वाटेल... होय ना! हीच भावना आज जालंधरच्या सुरेंद्र कुमार यांच्या मनात असेल...

Updated: Dec 31, 2015, 11:17 AM IST
ज्या कोर्टात वडील चहा विकतात, त्याच कोर्टात मुलगी बनली 'न्यायाधीश'! title=

नवी दिल्ली : आपण ज्या न्यायालयासमोर जिथे चहा विकतो त्याच न्यायालयात आपल्या मुलीला न्यायाधीश म्हणून पाहणं एखाद्या बापाला किती अभिमानास्पद वाटेल... होय ना! हीच भावना आज जालंधरच्या सुरेंद्र कुमार यांच्या मनात असेल...

जालंधरच्या नाकोदर जिल्हा न्यायालयात चहाचं दुकान चालवणाऱ्या सुरेंद्र कुमार यांचं स्वप्न त्यांच्य मुलीनं - श्रुतीनं साकार करून दाखवलंय. याच न्यायालयात श्रुती आता न्यायाधीश बनून लोकांचा न्यायनिवाडा करणार आहे. 

२३ वर्षांच्या श्रुतीनं पंजाब सिव्हिल सर्व्हिस परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास केली आणि आता ती जवळपास एका वर्षाच्या ट्रेनिंगनंतर न्यायाधीश बनण्यासाठी तयार आहे. यापूर्वी श्रुतीनं गुरु नानक देव विश्वविद्यालयातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं त्यानंतर पंजाब विश्व विद्यालयातून तीनं कायद्याचा अभ्यास केलाय. 

या यशानं श्रुती आणि तिची कुटुंबीय आनंदात आहेत. आपलं एखादं स्वप्न सत्यात उतरावं, असाच हा प्रसंग असल्याचं ते सांगतात. 

मंगळवारी, भाजपचे राज्यसभा खासदार आणि उपाध्यक्ष अवनीस राय खन्ना यांनी श्रुतीचा सन्मान करत तिला 'पंजाबची शान' म्हणून घोषित केलं.