डेव्हिड हेडलीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष

मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यातला महत्त्वाचा आरोपी डेव्हिड कोलोमन हेडली याची साक्ष नोंदवण्यास सुरुवात झालीय. 

Updated: Feb 8, 2016, 07:36 AM IST
डेव्हिड हेडलीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष title=

नवी दिल्ली : मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यातला महत्त्वाचा आरोपी डेव्हिड कोलोमन हेडली याची साक्ष नोंदवण्यास सुरुवात झालीय. 

सकाळी ७ वाजल्यापासून दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान हेडलीची साक्ष नोंदवली जाणार आहे. या आधी १० डिसेंबर २०१५ ला हेडलीची पहिली साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली होती. 

त्यानंतर आता ८ फेब्रवारीला पुन्हा त्याची साक्ष नोंदवली जाणार आहे. डेव्हिड हेडली याला मुंबईच्या विशेष मोक्का न्यायालयानं ४ अटींवर सरकारी साक्षीदार म्हणजेच माफीचा साक्षीदार बनवलं होतं. या चार अटी डेव्हिड हेडलीने मान्य ही केल्या आहेत.