दिल्लीत भाजपच्या आमदारावर गोळीबार

भाजपचे आमदार जिंतेद्र सिंह शंती यांच्यावर आज पहाटे अज्ञातांनी गोळीबार केला. हल्ल्यात शंती हे सुखरुप बचावले. 

Updated: Sep 3, 2014, 12:30 PM IST
दिल्लीत भाजपच्या आमदारावर गोळीबार title=

नवी दिल्ली : भाजपचे आमदार जिंतेद्र सिंह शंती यांच्यावर आज पहाटे अज्ञातांनी गोळीबार केला. हल्ल्यात शंती हे सुखरुप बचावले. 

हल्लेखोरांनी शंती यांच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. मात्र यांमधील एकही गोळी शंती यांना लागली नाही.

पूर्व दिल्लीमधील शंती यांच्या निवासस्थानाबाहेर मोटरसायकलवर आलेल्या तीन हल्लेखोरांनी सकाळी सहा वाजावयाच्या सुमारास त्यांच्यावर गोळीबार केला. यानंतर हल्लेखोर फरार झाले. 

शंती यांच्यावरील हल्ल्यामागील नेमके कारण काय आहे याचा तपास सुरू आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.