दिल्ली गँगरेप : देशभरातील प्रतिक्रिया

दिल्ली गँगरेप प्रकरणातील चारही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. यावरच देशभरातून एकच प्रतिक्रिया व्यक्त होतेय... ती म्हणजे ‘अखेर निर्भयाला न्याय मिळाला!’

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 13, 2013, 04:04 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आज दिल्लीच्या साकेत कोर्टानं एक ऐतिहासिक निकाल दिलाय. दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुकेश (वय २६), विनय शर्मा (२०), पवन गुप्ता (१९) व अक्षय सिंह ठाकूर (२८) या चारही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. यावरच देशभरातून एकच प्रतिक्रिया व्यक्त होतेय... ती म्हणजे ‘अखेर निर्भयाला न्याय मिळाला!’….

> हाच खरा न्याय.... हा मानवतेला काळिमा फासणारा गुन्हा होता. हा एक खून होता. संपूर्ण देश याच निर्णयाची प्रतिक्षा करत होता. प्रसारमाध्यमांनीही यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली – किरण बेदी
> आमच्या मुलीला अखेर न्याय मिळाला - निर्भयाचे वडील
> निर्भयाच्या कुटुंबाला आणि निर्भयाला न्याय मिळालाय. न्यायालयानं हा निर्णय देऊन एक उदाहरणच समोर ठेवलंय. यामुळे असे गुन्हे करताना प्रत्येकाला शिक्षेची भीती वाटल्याशिवाय राहणार नाही – सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय गृहमंत्री
> आमच्या तपास यंत्रणेसाठी ही एक समाधानाची बाब आहे – जॉईंट सीपी, दिल्ली पोलीस
> अखेर निर्भयाच्या कुटुंबाला न्याय मिळालाय. ही काही फक्त सामूहिक बलात्काराची घटना नव्हती तर या घटनेत एका मुलीचा जाणून-बुजून, थंड डोक्यानं जीव घेण्यात आला होता – शायना एन.सी, भाजप
> अशा घटना सहन केल्या जाणार नाहीत, हा संदेश देणं गरजेचं - न्यायाधीश योगेश खन्ना

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.