...या गावात जबरदस्तीनं तयार झालीय अविवाहीत तरुणांची फौज!

हरियाणाच्या ढिक्का टपरी या गावात सध्या अविवाहीत तरुणांची फौज तयार झालीय... कारण, या गावातील तरुणांसोबत एखादा शहाणा माणूस आपल्या मुलीचा विवाह करण्यास तयार होत नाही. कारण आहे या गावाचा काळाकुट्ट अंधार आणि अंधारातील तरुणांचं भविष्य...

Updated: Sep 26, 2015, 04:23 PM IST
...या गावात जबरदस्तीनं तयार झालीय अविवाहीत तरुणांची फौज! title=

हरियाणा : हरियाणाच्या ढिक्का टपरी या गावात सध्या अविवाहीत तरुणांची फौज तयार झालीय... कारण, या गावातील तरुणांसोबत एखादा शहाणा माणूस आपल्या मुलीचा विवाह करण्यास तयार होत नाही. कारण आहे या गावाचा काळाकुट्ट अंधार आणि अंधारातील तरुणांचं भविष्य...

देश स्वतंत्र झाल्यानंतर आज 68 वर्षानंतरही यूपी आणि हरियाणाच्या सीमेवर असणाऱ्या या गावात वीज पोहचलेली नाही.

हरियाणामध्ये वसलेलं हे गाव उत्तरप्रदेशात येतं... पण, यमुनाच्या तटावर असल्यानं भौगोलिक समस्यांमुळे या गावात अजूनही वीज पोहचलेली नाही. त्यामुळे, हरियाणा आणि उत्तर प्रदेश दोन्ही राज्यांनी या गावाला वाळीत टाकल्याचाच प्रकार झालाय. 

जे तरुण शिक्षणासाठी बाहेर गेलेत ते या गावात परतलेले नाहीत. हळूहळू गावातील लोकही हे गाव सोडून इतर ठिकाणी आपलं घर शोधण्यासाठी बाहेर पडतायत. 

या गावकऱ्यांनी उत्तरप्रदेशच्या आणि हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांपासून कॅबिनेट मंत्री आणि अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांचेच दरवाजे खटकावलेत...पण, त्यांचा आवाज मात्र कुणापाशीही पोहचत नाहीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.