मुस्लीम शिक्षक आणि मौलवींनी घेतली मोदींची भेट

मुस्लीम समुदायाच्या शिक्षक आणि मौलवींनी आज पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या मुलाखतीत केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी आणि एमजे अकबर देखील उपस्थित होते. यावेळेस पंतप्रधानांनी भारताची सभ्यता आणि संस्कृतीचं संदर्भ देत येथे कट्टरपंथीयांसाठी कोणतीच जागा नसल्याचं म्हटलं आहे. पण जगातील अनेक देशांमध्ये अजूनही कट्टरपंथीयांचा बोलबाला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Updated: Jan 19, 2017, 08:04 PM IST
मुस्लीम शिक्षक आणि मौलवींनी घेतली मोदींची भेट title=

नवी दिल्ली : मुस्लीम समुदायाच्या शिक्षक आणि मौलवींनी आज पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या मुलाखतीत केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी आणि एमजे अकबर देखील उपस्थित होते. यावेळेस पंतप्रधानांनी भारताची सभ्यता आणि संस्कृतीचं संदर्भ देत येथे कट्टरपंथीयांसाठी कोणतीच जागा नसल्याचं म्हटलं आहे. पण जगातील अनेक देशांमध्ये अजूनही कट्टरपंथीयांचा बोलबाला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मुस्लीम समुदायाचे शिक्षक आणि मौलवींनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. भारताचा समाजिक, सांस्कृतीक आणि  आर्थिक रचना अशी आहे की, येथे कोणीही दहशतवादाचं समर्थन नाही करत. सोबतच त्यांनी युवकांना शिक्षित करण्यासाठी आणि रोजगार उपलब्ध करुन देण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.