एन्काऊंटर प्रकरणी नरेंद्र मोदींना दिलासा

सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणी अमित शहा यांचा जामीन रद्द करण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे. तसेच हा खटला मुंबईत चालवण्याचे आदेशही कोर्टानं दिले आहेत.

Updated: Sep 27, 2012, 02:18 PM IST

www.24taas.com, अहमदाबाद
सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणी अमित शहा यांचा जामीन रद्द करण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे. तसेच हा खटला मुंबईत चालवण्याचे आदेशही कोर्टानं दिले आहेत.
त्यामुळं नरेंद्र मोदींना दिलासा मिळाला आहे. सोहराबुद्दीन एन्काऊंटरप्रकरणी शहा यांना जुलै २०१०मध्ये सीबीआयनं अटक केली होती..
शहा हे गुजरातचे माजी मंत्री असून नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानले जातात.. त्यामुळं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं मोदींना दिलासा मिळाला आहे.