गावातील सरपंच पती संस्कृती संपवा : पंतप्रधान

गावपातळीवर असलेली सरपंच पती संस्कृती संपवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. 

Updated: Apr 25, 2015, 06:38 PM IST
गावातील सरपंच पती संस्कृती संपवा : पंतप्रधान title=

नवी दिल्ली : गावपातळीवर असलेली सरपंच पती संस्कृती संपवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामीण भागात ग्रामपंचायत हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. अनेक ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदी महिला आहेत. मात्र प्रत्यक्षात कारभार त्या सरपंच महिलेचा पतीच सांभाळतो, हे वास्तव आहे. हे चित्र बदलण्याचं आवाहन नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय पंयायत राज दिन कार्यक्रमातून केलं. 

यावेळी सरपंच पती संस्कृती बाबत बोलताना, मोदींनी मिष्किल उदाहरण दिलं. एका राजकीय कार्यक्रमाला गेलो असताना एका व्यक्तीने स्वतःची ओळख एसपी अशी करुन दिली. हा 'एसपी' म्हणजे 'सरपंच पती' असल्याचा खुलासाही त्यांनी केला. कायद्यानं महिलांना अधिकार दिलेत. म्हणून महिलांनी त्यांचा सुयोग्य आणि पूर्ण वापर करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.