सरकार कचरा वेचणाऱ्यांचा सन्मान करणार

कचरा वेचणाऱ्यांनाही सन्मान पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. देशात जमा होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण आणि विल्हेवाटाची सक्षम यंत्रणाच अस्तित्वात नाही.

Updated: Jun 11, 2015, 04:40 PM IST
सरकार कचरा वेचणाऱ्यांचा सन्मान करणार title=

मुंबई : कचरा वेचणाऱ्यांनाही सन्मान पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. देशात जमा होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण आणि विल्हेवाटाची सक्षम यंत्रणाच अस्तित्वात नाही.

मात्र उपेक्षित जीवन जगणाऱ्या गरीब कचरा वेचणाऱ्यांनी मात्र या कचऱ्याचे वर्गीकरण आणि विल्हेवाट लावण्यात फार मोलाची भूमिका बजावली. 

कचरा वेचणाऱ्य़ांचे त्यांचे कार्य अतुलनीय आहे, त्याची दखल घेत पुढील वर्षापासून त्यांचाही सन्मान केला जाणार असल्याचं जावडेकर यांनी म्हटलं आहे.

सह्याद्री अतिथीगृहात मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत जावडेकर बोलत होते. दररोज जमा होणाऱ्या १५ हजार टन कचऱ्यापैकी फक्त ९ हजार टन कचरा उचलला जातो. 

ही समस्या सोडविण्यासाठी कचरा विल्हेवाटीसाठी नवीन नियमावली तयार करण्यात येत असल्याचे जावडेकर यांनी या वेळी सांगितले. शहरी भागाप्रमाणेच ३ हजार व त्यापेक्षा अधिक लोकवस्तीच्या गावांनाही कचऱ्याच्या विल्हेवाटीचे नियम लागू करण्यात येणार आहेत, असे जावडेकर यांनी सांगितले. 

स्वच्छ भारत मोहीम यशस्वी करण्यासाठी जमा होणारा कचरा वेळेत उचलणे आवश्यक आहे. शिवाय या कचऱ्याचे योग्य वर्गीकरण आणि विल्हेवाट स्वच्छ भारतासाठी आवश्यक आहे, असे ते म्हणाले. पारंपरिक कचऱ्याच्या जोडीला ई-कचरा, प्लॅस्टिक कचराही मोठ्या प्रमाणावर जमा होत आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.