आसाराम बापूंचं शिष्यत्व भोवलं, पतीनं केला पत्नीचा त्याग!

एकीकडे आसाराम बापू जेलमध्ये आहे, तर दुसरीकडे त्यांच्या कृत्यामुळं एका महिलेचा संसार मोडलाय. आसाराम बापूंची शिष्या असलेल्या एका महिलेला तिच्या पतीनं सोडून दिल्याची घटना गाजियाबादमध्ये घडलीय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 3, 2013, 10:46 AM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, गाजियाबाद
एकीकडे आसाराम बापू जेलमध्ये आहे, तर दुसरीकडे त्यांच्या कृत्यामुळं एका महिलेचा संसार मोडलाय. आसाराम बापूंची शिष्या असलेल्या एका महिलेला तिच्या पतीनं सोडून दिल्याची घटना गाजियाबादमध्ये घडलीय.
गाजियाबादच्या कवीनगर परिसरात राहणाऱ्या विक्रम (बदललेलं नाव) याचा विवाह अनिता (बदललेलं नाव) सोबत झाला होता. पाच महिन्यांपूर्वी त्यांचं लग्न झालं. अनिता आसाराम बापूंची भक्त आहे. तिनं लग्नापूर्वीचं आसाराम बापूंची दीक्षा घेतली होती. मात्र हे विक्रमला आधी माहित नव्हतं.
काही दिवसांपूर्वी अनितानं विक्रमला आपण आसाराम बापूंची शिष्या असल्याचं सांगितलं. मात्र आपल्या बायकोच्या तोंडून आसाराम बापूंचं नाव ऐकताच विक्रमचा पारा भडकला. त्यानं अनिताशी बोलणंच टाळलं. अनिता आपल्या माहेरी परतली असून तिनं गाजियाबाद पोलिसांच्या महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रार केलीय. आता या दोघांचं काऊंसलिंग सुरू असून त्यांचं नातं पूर्ववत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आपल्यापासून अनेक गोष्टी लपवून ठेवल्या गेल्या, असे आरोप दोन्ही पक्ष एकमेकांवर लावतायेत.
एकूणच काय आसाराम बापूंच्या रासलिलांमुळं अशा किती अनितांचा संसार मोडणार सांगता येत नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.