मोदींसमोर तिनं ऐकवलं रामायण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी 66 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी गुजरातच्या नवसारीमध्ये एक रॅली आयोजित करण्यात आली होती.

Updated: Sep 18, 2016, 08:01 AM IST
मोदींसमोर तिनं ऐकवलं रामायण  title=

नवसारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी 66 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी गुजरातच्या नवसारीमध्ये एक रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीत मोदींचं वेगळं रुप पाहायला मिळालं. एका दिव्यांग मुलीला कडेवर घेऊन मोदी व्यासपीठावर आले. त्यानंतर या चिमुकलीनं मोदींच्या कडेवरुनच उपस्थित जनसमुदायाला रामायण ऐकवलं. 

या चिमुकलीच्या तोंडून रामायण ऐकून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. या चिमुकलीचं नाव गौरी शार्दूल असं आहे. दिव्यांगासाठी नवसारीमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोदी गौरीला घेऊन व्यासपीठावर आले. घाबरलेल्या गौरीला मोदींनी धीर दिला आणि रामायण ऐकवण्याची विनंती केली. 

मोदींची विनवणी ऐकून मग पहिल्या इयत्तेत शिकणा-या गौरीनं रामायण ऐकवण्यास सुरुवात केली. गौरीकडून रामायण ऐकून उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाट तिचं कौतुक केलं. मोदींनीही या रॅलीनंतर ट्विट करुन हा दिवस संस्मरणीय असल्याचं म्हटलं आहे.