'मुलींनो बाईक चालवाल तर जिवंत जाळू'

शहरात धमकीची पत्रके काही ठिकाणी लावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मुलींनो बाईक चालवाल, तर बाईकसह जिवंत जाळू, अशा धमकीची पत्रकं लावण्यात आली आहेत.

Updated: Aug 1, 2016, 06:09 PM IST
 'मुलींनो बाईक चालवाल तर जिवंत जाळू' title=

श्रीनगर : शहरात धमकीची पत्रके काही ठिकाणी लावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मुलींनो बाईक चालवाल, तर बाईकसह जिवंत जाळू, अशा धमकीची पत्रकं लावण्यात आली आहेत.

'काश्मीर खोऱ्यातील बंधू आणि बघिणींनो काश्मीर आपला असून याचा निर्णय आम्ही घेऊ, काश्मीरमध्ये सध्या सुरू असलेल्या आंदोलनाला सर्वांनी पाठिंबा द्यावा. काश्मीरविरुद्धची लढाई संपेपर्यंत दुकाने बंद ठेवावीत. काश्मीरमधील कोणा नागरिकांच्या घरांमध्ये खाण्याच्या वस्तू नाहीत, असे कोणी नाही. परंतु, असे कोणी असल्यास आमच्याशी संपर्क साधावा, यासाठी आम्ही मदत करू', असे भिंतीवर चिटकविलेल्या पत्रकांमध्ये म्हटले आहे.

पोलिसांनी म्हटलंय, भिंतींवर चिटकविण्यात आलेल्या पोस्टर्सबाबत चौकशी सुरू आहे, फ्रीडम मूव्हमेंट ऑफ काश्मीर व्हॅली, असं पत्रकावर लिहिण्यात आलं आहे.

हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा कमांडर बुऱहाण वणीला ठार केल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चालली आहे. काश्मीरमध्ये जवानांवर दगडफेक करणाऱयांनी अशा प्रकारची पत्रके लावल्याची माहिती पुढे येत आहे.