जागतिक मंदीमुळे सोने झाले स्वस्त

जागतिक मंदीमुळे सराफा बाजारात मंदी दिसत आहे. सोने बाजारात या घडामोडीचे पडसाद उमटले आहेत. दिल्लीत १८६ रुपयांनी सोने दरामध्ये घसरण झालेली पाहायला मिळाली. सोने प्रति १० ग्रॅम (तोळे) २७,२६२ रुपये इतके होते.

PTI | Updated: Aug 25, 2015, 05:50 PM IST
जागतिक मंदीमुळे सोने झाले स्वस्त title=

नवी दिल्ली : जागतिक मंदीमुळे सराफा बाजारात मंदी दिसत आहे. सोने बाजारात या घडामोडीचे पडसाद उमटले आहेत. दिल्लीत १८६ रुपयांनी सोने दरामध्ये घसरण झालेली पाहायला मिळाली. सोने प्रति १० ग्रॅम (तोळे) २७,२६२ रुपये इतके होते.

एमसीएक्समध्ये सोने दर ऑक्टोबरमध्ये घसरला होता. १८६ रुपयांनी येथे घसरण झाल्याचे पाहायला मिळाली. तसेच ०.६८ टक्के घट होऊन २७,२६२ प्रति तोळा सोने होते. 

सोने डिसेंबर महिन्यात १८७ रुपये म्हणजेच ०.६८ टक्के घसरण पाहायला मिळाली. यावेळी सोने दर प्रति तोळा २७, ६६७ होता.  हा परिणाम जागतिक कमजोरीमुळे पाहायला मिळाला. सराफा अभ्यासकांच्या मते, सोने दरात झालेली घसरण ही जागतिक मंदीमुळे पाहायला मिळत आहे. न्यूयॉर्कच्या बाजारात सोने दरात घसरण पाहायला मिळत आहे. ०.४७ टक्के घट होऊन १,१५४.९० डॉलर प्रति औंस दर होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.