गुड न्यूज: सोन्यात २०० रुपयांनी, तर चांदीत १,५५० रुपयांनी घट

सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी घसरण नोंदली गेली आहे. जागतिक बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर आभूषण विक्रेत्यांची मागणी घटल्यानं राजधानी दिल्लीच्या सराफ्यात आज सोन्याचा भाव २०० रुपयांनी घटून २८,१०० रुपये प्रति १० ग्रॅम राहिला. 

PTI | Updated: Feb 1, 2015, 11:38 AM IST
गुड न्यूज: सोन्यात २०० रुपयांनी, तर चांदीत १,५५० रुपयांनी घट title=

नवी दिल्ली: सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी घसरण नोंदली गेली आहे. जागतिक बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर आभूषण विक्रेत्यांची मागणी घटल्यानं राजधानी दिल्लीच्या सराफ्यात आज सोन्याचा भाव २०० रुपयांनी घटून २८,१०० रुपये प्रति १० ग्रॅम राहिला. 

औद्योगिक संस्था आणि नाणे निर्मात्यांच्या कमजोर मागणीनं चांदीचा भावही १,५५० रुपयांनी घसरून ३७,५५० रुपये प्रतिकिलो झाला.

बाजार जाणकारांनी सांगितलं की, सध्याच्या पातळीवर स्थानिक सराफ्यात आभूषण विक्रेत्यांची मागणी घटली असतानाच जागतिक बाजारातही कमजोर कल राहिला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.