आयात नियंत्रणात सूट दिल्याने सोन्याच्या दरात घट

सोनेच्या आयातीवरील नियंत्रणात सूट दिल्यानंतर सोन्याचे भावात सतत घट होत आहे. दिल्ली सराफा बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे भाव २०० रुपयांची घट दिसून आली. त्यामुळे प्रति १० ग्रॅमला सोने २६२०० रुपये कमी झाले. ही किंमत २५००० पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. मुंबईत काल सोने २६ हजार १५० रुपये होते ते आज २५ हजार ७३० पर्यंत खाली आहे. 

Updated: Dec 1, 2014, 08:20 PM IST
आयात नियंत्रणात सूट दिल्याने सोन्याच्या दरात घट  title=

नवी दिल्ली : सोनेच्या आयातीवरील नियंत्रणात सूट दिल्यानंतर सोन्याचे भावात सतत घट होत आहे. दिल्ली सराफा बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे भाव २०० रुपयांची घट दिसून आली. त्यामुळे प्रति १० ग्रॅमला सोने २६२०० रुपये कमी झाले. ही किंमत २५००० पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. मुंबईत काल सोने २६ हजार १५० रुपये होते ते आज २५ हजार ७३० पर्यंत खाली आहे. 

आखिल भारतीय सराफा असोशिएशनचे उपाध्यक्ष सुरेंद्र कुमार जैन यांनी सांगितले की, भारतीय रिझर्व बँकेच्या निर्णयानंतर पुरवठा वाढण्याने येणाऱ्या दिवसात सोन्याच्या किंमतीत आणकी घट होऊ शकते. ही किंमती प्रति १० ग्रॅम २५००० रुपयांपर्यंत खाली येऊ शकते. सिंगापूरमध्ये सोन्याच्या भावात २.१ टक्के घट आली त्यामुळे हा दर ११४२.८८ डॉलर प्रति औस तर चांदीच्या दरात ८ टक्के घट झाली त्यामुळे १४.४२ डॉलर प्रति औंस झाले आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.