सरकारी कर्मचाऱ्यांना अच्छे दिन, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीला मंजुरी

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात २३ टक्के वाढ होणार आहे. तशी शिफारस करण्यात आली आहे.

Updated: Jun 29, 2016, 12:17 PM IST
सरकारी कर्मचाऱ्यांना अच्छे दिन, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीला मंजुरी title=

नवी दिल्ली : सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात २३ टक्के वाढ होणार आहे. तशी शिफारस करण्यात आली आहे.

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत शिफारस मंजूर करण्यात आली आहे. या शिफारशीनुसार वेतनात २३ टक्के वाढ करण्याची शिफारस आहे. 

४७ लाख विद्यमान कर्मचारी आणि ५२ लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.  त्यामुळे सरकारी कर्मचा-यांना अच्छे दिन आले आहे. आता राज्य सरकारी कर्मचारीही आता सातव्या वेतन आयोगाची मागणी करण्याची शक्यता आहे.

आयएएस, आयपीएस, आयआरएस याना एकच वेतन श्रेणी मिळणार. कमीत २३,५०० रुपये कमीत कमी पगार तर जास्तीत जास्त ३.२५ लाख पगाराचा आकडा असणार.