नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रीमंडळानं आज औद्योगिक कर्मचाऱ्यांचा बोनस वाढवून ७००० रुपये प्रति महिना केलाय. आता ज्यांचा मासिक पगार २१ हजार रुपये असेल त्या कर्मचाऱ्यांनाही बोनस मिळेल.
पहिले ही सीमा १० हजार रुपये होती. यात संशोधन करून आलेल्या विधेयकाला कॅबिनेटनं मंजुरी दिलीय. केंद्रीय श्रमिक संघटनेने २ सप्टेंबरला उपोषण केल्यानंतर केंद्राने बोनसच्या पात्रतेसाठी वेतन मर्यादेचा आधार वाढवण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं.
सणासुदींच्या काळात मंत्रिमंडळानं बोनस रक्कम कायदा १९६५ मध्ये संशोधनासाठी एका विधेयकावर विचार करण्याचा निर्णय घेतलाय. या प्रस्तावा अंतर्गत बोनस मिळविण्यासाठीची वेतन सीमा सध्या १० हजार रुपये प्रति महिना वाढवून २१ हजार रुपये प्रति महिना केलीय. त्यामुळं अधिक संख्येत कर्मचाऱ्यांना याचा फायदा होईल.
आतापर्यंत १० हजार रुपयांपर्यंत वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ३ हजार ५०० रुपयांनुसार बोनस देण्याची तरतूद आहे. मात्र नव्या प्रस्तावानुसार ही मर्यादा १० हजार रुपयांवरुन २१ हजारांवर नेण्याची शिफारस करण्यात आली आहे. १ एप्रिल २०१५ पासून ही अट लागू करण्याचा प्रस्ताव संसदेत मांडला जाईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.