10 लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्यांना नाही गॅस सबसिडी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर अनेक ग्राहकांनी गॅस सिलिंडरवरील अनुदान न घेण्याचा निर्णय घेतला होता.

Updated: Dec 28, 2015, 07:20 PM IST
10 लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्यांना नाही गॅस सबसिडी title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर अनेक ग्राहकांनी गॅस सिलिंडरवरील अनुदान न घेण्याचा निर्णय घेतला होता. आतापर्यंत ६० लाख ग्राहकांनी स्वेच्छेने गॅस सिलिंडरवरील अनुदान न घेण्याचा निर्णय स्वेच्छेने घेतला आहे. पण आता सरकारने निकष बदलले आहे. 

उच्च उत्पन्न असलेल्या ग्राहकांना गॅस सिलिंडरवर अनुदान न देण्याचा निर्णय आता सरकारने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी पुढील वर्षापासून करण्यात येणार आहे. वार्षिक उत्पन्न १० लाखांपेक्षा कमी असलेल्या ग्राहकांनाच पुढील महिन्यापासून सरकारी अनुदान मिळणार आहे.

भारतात एकूण १६ कोटी गॅस धारक आहेत. त्यापैकी 60 लाख ग्राहकांनी मोदींच्या आवाहनानंतर सबसिडी सोडली. 10 लाखांहून अधिक करपात्र उत्पन्न असलेल्यांना यापुढं गॅस सबसिडी मिळणार नाही.