गुलबर्ग हत्याकांडप्रकरणी ११ आरोपींना जन्मठेप

२००२ मध्ये अहमदाबादच्या गुलबर्ग सोसायटी हत्याकांडाप्रकरणी आज ११ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय तर १२ जणांना सात वर्षाचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलीय. त्याचप्रमाणे एका आरोपीला १० वर्ष तुरुंगवासाची शिक्षा विशेष 'एसआयटी' न्यायालयानं ठोठावलीय.

Updated: Jun 17, 2016, 01:36 PM IST
गुलबर्ग हत्याकांडप्रकरणी ११ आरोपींना जन्मठेप title=

नवी दिल्ली : २००२ मध्ये अहमदाबादच्या गुलबर्ग सोसायटी हत्याकांडाप्रकरणी आज ११ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय तर १२ जणांना सात वर्षाचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलीय. त्याचप्रमाणे एका आरोपीला १० वर्ष तुरुंगवासाची शिक्षा विशेष 'एसआयटी' न्यायालयानं ठोठावलीय.

२००२ मध्ये झालेल्या दंगली दरम्यान अहमदाबादच्या गुलबर्ग सोसायटीत ६९ जणांना जिवंत जाळण्यात आलं होतं. याप्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयानं नेमलेल्या एसआयटीनं तपास केला.

या तपासानंतर गेल्या सात वर्षांपासून हा खटला सुरू होता. गेल्या महिन्याच्या शेवटी याप्रकरणी एसआयटीच्या विशेष कोर्टानं निकाल दिला आणि ३६ निर्दोष ठरवले होते तर २४ जणांना दोषी ठरवण्यात आलं होतं.

आज याप्रकरणी शिक्षेची सुनावणी झाली. पण, एसआयटी न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेनंतर बळींचे कुटुंबीय अधिक शिक्षेसाठी न्यायालय उच्च न्यायालयात जाणार आहेत.