हार्दिक पटेल यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल

पटेल आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांच्याविरोधात गुजरातच्या सूरत शहरातील अमरोलीत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Updated: Oct 19, 2015, 10:59 AM IST
हार्दिक पटेल यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल title=

सूरत : पटेल आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांच्याविरोधात गुजरातच्या सूरत शहरातील अमरोलीत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूरत पोलीस आयुक्त राकेश आस्थाना यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी हा व्हिडीओ व्हायरल झाला होता, या व्हिडीओत हार्दिक पटेल आपल्या एका साथीदाराला सांगतोय की, "पाटीदार आत्महत्या करत नाहीत, जर दम असेल, तर तीन-चार पोलिसांना मारा."

अस्थाना यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडीओ समोर आल्यानंतर आम्ही व्हिडीओ तपासून पाहिला, प्राथमिक दृष्ट्या या व्हिडीओ तपासण्यात आला, यावरून हार्दिक पटेलविरोधात रविवारी अमरोली पोलीस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा आणि हत्येची धमकी देण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सूरत पोलीस हार्दिक पटेल यांना सोमवारी ताब्यात घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.