देशभरात उष्णतेचा कहर, उष्माघातानं ५०० हून अधिक जणांचा बळी

देशात उष्णतेच्या लाटेनं आतापर्यंत एकूण ४३२ जणांचा बळी घेतलाय. एकट्या आंध्र प्रदेशात आतापर्यंत १६२ जणांचा उष्माघातानं मृत्यू झालाय. तर तेलंगणात १८६ जणांनी उष्माघातामुळे जीव गमावला आहे. 

Updated: May 25, 2015, 02:17 PM IST
देशभरात उष्णतेचा कहर, उष्माघातानं ५०० हून अधिक जणांचा बळी title=

नवी दिल्ली: देशात उष्णतेच्या लाटेनं आतापर्यंत एकूण ५०० जणांचा बळी घेतलाय. नुसत्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणात आतापर्यंत ४३२ जणांचा उष्माघातानं मृत्यू झालाय. तर विदर्भात सहा जणांचा उष्माघातानं मृत्यू झाला.

यात सर्वाधिक संख्या ही मजूरांची आहे. उत्तराखंडमधल्या मसुरी सारख्या थंड हवेच्या ठिकाणीही ३६ अंश तापमानाची नोंद झालीय. तर तेलंगणा राज्यातल्या खम्मम इथं पारा ४८ अंशांपर्यंत पोहोचलाय. देशातलं हे सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलंय. 

विदर्भातही लागोपाठ तिसऱ्या दिवशी ४७ अंश तपमान नोंदवलं गेलंय. दिल्लीत तापमान साडे चव्वेचाळीस अंश इतकं आहे. मध्य प्रदेश, विदर्भ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, झारखंड इथं दोन दिवस तपमानातील वाढ कायम राहील, असा इशारा हवामान खात्यानं दिलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.