हनीमून कपल्सची बनवली पॉर्न फिल्म

By Prashant Jadhav | Last Updated: Wednesday, January 16, 2013 - 19:20

www.24taas.com, नोएडा
हनीमून कपल्सचे व्हिडिओ बनवून पॉर्न साइटवर टाकणाऱ्या टोळीचा नोएडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अंकुर आणि हरविंदर असे या दोघांची नावे असून ते हॉटेल मालकांशी संगनमत करून हॉटेलच्या रूममध्ये गुप्त कॅमेरे बसवत होते. नवविवाहितांची संपूर्ण रात्र आपल्या पॉर्न साइटवर टाकत होते.
त्यांनी हे नेटवर्क भारतासह परदेशातील अनेक हॉटेल्समध्ये पसरविले होते. नोएडा पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे. यात अंकुर आणि हरविंदरसह एका हॉटेलच्या मालकाला आणि डोमेन रजिस्टर करणाऱ्यालाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंकुर आणि हरविंदर ६ पॉर्न साइट चालवत होते. त्यांचे फ्रान्स, जर्मनीसह युरोपातील अनेक देशांमध्ये नेटवर्क होते. भारतातील असा कोणताही शहर नसेल की त्यांनी गुप्त कॅमेरा लावला नसेल, असे पोलिसांनी सांगितले.
कशी पकडली गेली चोरी
नोएडा पोलिसांकडे एका जोडप्याने तक्रार केली. पोलिसांकडे तक्रार करणाऱ्या जोडप्याने आपले फोटो एका वेबसाइटवर पाहिले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. हे नवविवाहीत दाम्पत्य राजस्थानच्या ज्या हॉटेलमध्ये हनीमूनला गेले होते, त्या ठिकाणी व्हिडिओ आणि फोटो वेबसाइटवर टाकण्यात आले होते. तक्रार मिळाल्यावर नोएडा पोलिसांनी जालंदर येथून दोघांना अटक केली. या आरोपींचे नेटवर्क राजस्थानच्या बऱ्याच हॉटेलशी जोडले गेले आहे. हॉटेलवाल्यांच्या संगनमताशिवाय गुप्त कॅमेरे लावता आले नसते. अशा प्रकारे नवविवाहीत जोडप्यांचे व्हिडिओ डझनभर वेबसाइटवर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

First Published: Wednesday, January 16, 2013 - 19:19
comments powered by Disqus