इतकी आहे मोदी सरकारच्या मंत्र्यांची मालमत्ता

नवी दिल्ली : पंतप्रधान कार्यालयातर्फे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मालमत्तेविषयी काही घोषणा करण्यात आल्या आहेत. 

Updated: Feb 3, 2016, 02:46 PM IST
इतकी आहे मोदी सरकारच्या मंत्र्यांची मालमत्ता  title=

नवी दिल्ली : पंतप्रधान कार्यालयातर्फे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मालमत्तेविषयी काही घोषणा करण्यात आल्या आहेत. यातील एक विशेष बाब म्हणजे बहुतेक मंत्र्यांची संपत्ती ही रिअल इस्टेटच्या स्वरुपात आहे. 

जास्तीत जास्त मंत्र्यांनी आपल्याकडील पैसे हे फिक्स्ड डिपॉझीटच्या माध्यमात गुंतवले आहेत. शेअर्स आणि कंपनीजचे बाँड्स यात कमी मंत्र्यांचे पैसे आहेत. तरी पंतप्रधान कार्यालयातर्फे राजनाथ सिंह, अरुण जेटली, नितीन गडकरी, मनोहर पर्रिकर, मेनका गांधी आणि डॉ. हर्ष वर्धन यांसारख्या काही महत्त्वाच्या मंत्र्यांची स्थावर मालमत्ता घोषीत करणे अद्याप बाकी आहे. 

किती आहे मोदी सरकारच्या मंत्र्यांची संपत्ती, जाणून घेऊ या

स्मृती इराणी, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री - मुंबईत ९० लाखांचं घर आणि गोव्यात ८७.५० लाखांचा फ्लॅट, दोन गाड्या, दागिने, बँकेत काही रक्कम, एफडीज, एनएससी आणि काही कंपन्यांचे समभाग

सुषमा स्वराज, परराष्ट्र मंत्री - दिल्लीत एक राहण्याचे घर, पलवल येथे जमीन, २३ लाखांचे दागिने आणि काही एफडीज.

वेंकैया नायडू, शहरी विकास मंत्री - बँकेत २८ लाखांची बचत आणि पत्नीच्या नावावर काही संपत्ती. 

सुरेश प्रभू, रेल्वे मंत्री - मुंबईत एक फ्लॅट, महाराष्ट्रात काही शेतजमीन आणि गोव्यात बिगर शेतजमीन, म्युच्युअल फंड, लिस्टेड आणि अनलिस्टेड कंपन्यांच्या समभागांत गुंतवणूक.

महेश शर्मा, सांस्कृतिक, पर्यटन आणि नागरी उड्डाण राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) - पाच घरे (एकूण मूल्य - १९.१९ कोटी रुपये), दोन गाड्या (लँड क्रूझर आणि मित्सुबिशी लँसर), काही कंपन्यांचे समभाग. 

डॉ. जितेंद्र सिंग, पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री - जम्मूमध्ये १.९४ कोटी रुपयांचं घर आणि ३३ लाखाची शेतजमीन

राधा मोहन सिंग, कृषी मंत्री - बिहार आणि नॉयडात ६२ लाखांची संपत्ती, बिहारमध्ये शेतजमीन आणि बिन शेतजमीन, सोने, एफडीमध्ये गुंतवणूक, दोन मोबाईल फोन, एक घड्याळ, एक रिवॉल्वर आणि एक रायफल

थावर चंद गहलोत, सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्री - ३९ लाखांची दोन घरे, १.६ कोटी रुपयांचा एक पेट्रोल पंप, दोन मोटरसायकल्स, दोन गाड्या (मारुती स्विफ्ट आणि टाटा सफारी), एक स्कूटी, सोन्याचे दागिने, मोबाईल, आयपॅड आणि बँकेत काही जमा राशी. त्याचसोबत एक रिवॉल्वर आणि एक बंदूक.

चौधरी विरेंद्र सिंग, ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री - हरयाणा राज्यात तीन आणि दिल्लीत एक घर, हरयाणात शेती आणि व्यापारी जागा, दोन गाड्या (मर्सिडीज आणि इनोव्हा) आणि बँकेत एफडीव्यतिरीक्त काही जमा राशी.

हरसिमरत कौर बादल, खाद्य प्रक्रिया उद्योग मंत्री - बँका, असूचीबद्ध कंपन्यांच्या समभागात काही गुंतवणूक (ज्यात त्यांच्या पतीच्या मालकीच्या उद्योगातील काही कंपन्यांमध्येही गुंतवणूक), शेअरखान मध्येही एक गुंतवणूक खातं.

अशोक गजपती राजू, नागरी उड्डाण मंत्री - बँक खाते, एफडीज, वेगवेगळ्या कंपन्यांच्या समभागीत गुंतवणूक. टाटा स्टील, अॅग्रो टेक फूड्स, अशोक लेलँड, बालाजी टेलीफिल्म्स, केयर्न इंडिया, भारत इलेक्ट्रॉनिक्स, धनलक्ष्मी बँक, एक्साइड, हॅवेल्स, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, एनएचपीसी, एनडीटीवी, एनटीपीसी, सन टीवी, टीवीएस मोटर्स, विप्रो, भारती एयरटेल, कोल इंडिया, एचडीएफसी लिमिटेड, आयडिया सेल्युलर, टीवी टुडे, यूनाइटेड स्पिरिट्स और यस बैंक या कंपन्यांचा समावेश. 
त्यांनी दिलेल्या अन्य माहितीनुसार त्यांच्याकडे एक जीप आणि एक नॅनो गाडी आहे. काही प्रमाणात शेतजमीन आणि बिगरशेतीची जमीनही आहे. 

जे. पी. नड्डा, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री - काही स्थावर मालमत्ता आणि जमीन, बँकेत बचत खाते, काही इन्श्युरन्स पॉलिसीज, दोन गाड्या आणि काही दागिेने. 

रवी शंकर प्रसाद, दूरसंचार मंत्री - बँकेतील जमा राशीशिवाय काही बाँड्स, डिबेंचर्स आणि म्युच्युअल फंड यांसोबत २५ प्रकारच्या आर्थिक गुंतवणूकी. यात सहारा मल्टी प्लस मध्ये केलेली २,५४,१५६ रुपयांची गुंतवणूकही सामाविष्ट आहे. याशिवाय चार गाड्या, दागिने, शेतजमीन आणि बिगर शेतजमीन आणि काही स्थावर मालमत्ता यांचा समावेश आहे.