सावधान! पीएफमधून पैसे काढाल तर...

भविष्य निर्वाह निधी (पीएफ)मधून वारंवार पैसे काढणं आता आपल्याला महागात पडू शकतं. पाच वर्षांपूर्वी पीएफ खात्यातून पैसे काढले तर 10 टक्के टीडीएस कापला जाईल.

Updated: Mar 11, 2015, 05:01 PM IST
सावधान! पीएफमधून पैसे काढाल तर... title=

मुंबई: भविष्य निर्वाह निधी (पीएफ)मधून वारंवार पैसे काढणं आता आपल्याला महागात पडू शकतं. पाच वर्षांपूर्वी पीएफ खात्यातून पैसे काढले तर 10 टक्के टीडीएस कापला जाईल.

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यावेळी बजेटमध्ये पीएफवर टीडीएस कापणार असल्याची तरतूद केलीय. जी 1 एप्रिल 2015पासून लागू होणार आहे. यानुसार पीएफ खातेधारकानं पाच वर्षांपूर्वी आपल्या खात्यातून पैसे काढले तर त्यावर टीडीएस कापला जाईल.

जर पीएफ खातेधारक जुन्या पीएफ अकाऊंटवरून नव्या खात्यावर किंवा जुन्या एम्पलॉयरकडून नव्या एम्पलॉयरमध्ये स्थानांतरित झाला असेल. तर त्याची मोजणी पाच वर्षात केली जाईल. पीएफमधून काढली गेलेली रक्कम 30 हजार रुपयांहून कमी असेल तर त्यावर टीडीएस द्यावा लागणार नाही.

अधिक टॅक्स

सरकारी आणि खाजगी कर्मचाऱ्यांसाठी पीएफ खात्यासोबत आपला पॅन कार्ड नंबर देणं आवश्यक झालंय. पॅन कार्ड नंबर नसल्यास पीएफ खात्यातून पैसे काढण्यावरील टॅक्सची रक्कम आयकर स्लॅबनुसार 35 टक्के होऊ शकते.

गुंतवणुकीत त्रास

पीएफ खात्याची रक्कम सर्वाधिक सुरक्षित, टॅक्स विरहित आणि अधिक रिटर्न्स देणारी मानली जाते. सरकार पीएफची रक्कम सुरक्षित बॉण्डसह इतर कार्यांमध्ये गुंतवणूक करते. मागील काही वर्षांपासून पीएफ खात्यातून रक्कम काढण्याचं प्रमाण वाढलंय. ज्यामुळं सरकारला गुंतवणूक केलेली रक्कम वारंवार काढावी लागते. यापासूनच वाचण्यासाठी आणि पीएफची रक्कम भविष्यासाठी सुरक्षित ठेवण्यासंदर्भात जागरुकता करण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचललंय. 

सरकारनं हे पाऊल पहिल्यांदा उचललंय. यामुळं पीएफ काढल्यास 10 टक्के टीडीएस लागेल. नंतर टीडीएसची रक्कम परत मिळेल. मात्र खातेधारक दुविधेत फसतील. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.