अधुरी एक कहाणी... पती भारतात तर पत्नी बांग्लादेशमध्ये

भारत बांग्लादेश या दोन देशांमध्ये सीमा प्रश्नांवर बरेच वर्षे वाद चालू होता.  ६८ वर्षानंतर जागेच्या अदलाबदलीचा करार शुक्रवारी मध्यरात्री लागू झाला. 

Updated: Aug 1, 2015, 06:01 PM IST
अधुरी एक कहाणी... पती भारतात तर पत्नी बांग्लादेशमध्ये  title=

नवी दिल्ली : भारत बांग्लादेश या दोन देशांमध्ये सीमा प्रश्नांवर बरेच वर्षे वाद चालू होता.  ६८ वर्षानंतर जागेच्या अदलाबदलीचा करार शुक्रवारी मध्यरात्री लागू झाला. 

६८ वर्षानंतर झालेल्या या कराराला ऐतिहासिक दिवसाचे महत्व प्राप्त झाले आहे. या करारानुसार ५० हजारपेक्षा जास्त लोकांना पहिल्यांदाच नागरिकत्व मिळणार आहे. मात्र याचा काहींना लाभ झाला तर काहींना तोटा झाला.  

या घटनेचे पडसाद दोन्ही देशांच्या नागरिकांवर झाले. काहींना या कराराचा उपयोगच झाला तर काहींच्या नात्यात या करारामुळे दुरावाही निर्माण झाला.

डसिआरछारामध्ये राहणारे एक दाम्पत्य याच करारामुळे वेगळे झाले आहे. या कुटुंबातील आलम याला भारतात राहायचे आहे तर मरिना हिला बांग्लादेशमध्ये राहायची इच्छा आहे. 

सुरूवातीला मरिना हिने आलमच्या निर्णयाला मान्यता देऊन भारतात राहण्याचा निर्णय घेतला होता पण काही कारणाने तिने बांग्लादेशमध्येच आपले आयुष्य घालवायची इच्छा व्यक्त केली.

दोघांच्या इच्छेप्रमाणे त्यांनी घटस्फोट घेऊन दूर राहायचे ठरवले. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. 

एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार ६२ वर्षीय हामिद शेख आणि त्यांचे ८२ वर्षीय मामा शोभान अली शेख यांच्या कुटुंबाला भारत तसेच बांग्लादेश दोन्ही देश आपले नागरिकत्व देण्यास तयार नाहीत. 

हे दोन्ही कुटुंब १९ वर्षापूर्वी 'बीएसएफ'च्या १२ जवानांना वाचवण्याचा प्रयत्न करत असता भारतीय सीमेवर आले होते.

परत आपल्या घरी जात असता त्यांना घर जमीनदोस्त आढळलं. बांग्लादेश त्यांना देशद्रोही समजू लागला तर भारत त्यांना घुसखोर समजू लागला. यामुळे या कुटुंबाला नागरिकत्व द्यायला दोन्ही देश तयार नाहीत.
 
भारत बांग्लादेश एन्क्लेव्हमध्ये राहणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मते अनेक कुटुंबामध्ये आलम आणि मारियासारखी परिस्थिती आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.