'निर्भया'वरील 'इंडियाज डॉटर' प्रसारीत न करण्याच्या सूचना

सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने सर्व न्यूज चॅनेल्सना निर्भयावर बनवण्यात आलेली इंडियाज डॉटर ही डॉक्युमेंटरी प्रसारीत न करण्याची सूचना जारी केली आहे.

Updated: Mar 4, 2015, 09:23 AM IST
'निर्भया'वरील 'इंडियाज डॉटर' प्रसारीत न करण्याच्या सूचना title=

नवी दिल्ली : सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने सर्व न्यूज चॅनेल्सना निर्भयावर बनवण्यात आलेली इंडियाज डॉटर ही डॉक्युमेंटरी प्रसारीत न करण्याची सूचना जारी केली आहे.

 बीबीसीने दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ रोजी झालेल्या सामूहिक बलात्कारवर ही डॉक्युमेंटरी बनवली आहे. या प्रकरणातील एका आरोपीची मुलाखत प्रसारीत न करण्यासाठी सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने नियमांची आठवण करून दिली आहे.

देशातील सर्व न्यूज चॅनेल्सना याबाबतीत सूचना आणि प्रसारण मंत्रालयाकडून प्रसारण न करण्याचे कळवण्यात आले आहे.

या आरोपीची मुलाखत तिहार जेलमधून घेण्यात आली आहे. या डॉक्युमेंटरीत आरोपीला आपल्या कृत्यावर कोणताही पश्चाताप नसल्याचं दिसतंय.

या मुलाखतीवरून वादाला सुरूवात झाला आहे, म्हणून सरकारने तिहार जेल प्रशासनाकडून याचं उत्तर मागवलं आहे.

निर्भयाच्या आई-वडिलांनी आरोपीच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.