भारतीय नौदलाचं विमान समुद्रात कोसळलं, दोन बेपत्ता

भारतीय नौदालचं डॉनिअर या गस्त घालणाऱ्या विमानाला अपघात झाला आहे, विमानाचा वैमानिक आणि एक अधिकारी बेपत्ता असल्याचं सांगण्यात येतंय. हे  विमान काल गोव्याच्या दक्षिणेला समुद्रात कोसळलंय.

Updated: Mar 25, 2015, 09:12 AM IST
भारतीय नौदलाचं विमान समुद्रात कोसळलं, दोन बेपत्ता  title=

पणजी : भारतीय नौदालचं डॉनिअर या गस्त घालणाऱ्या विमानाला अपघात झाला आहे, विमानाचा वैमानिक आणि एक अधिकारी बेपत्ता असल्याचं सांगण्यात येतंय. हे  विमान काल गोव्याच्या दक्षिणेला समुद्रात कोसळलंय.

नियमित गस्तीसाठी विमानानं उड्डाण केल्यानंतर, रात्री अकराच्या सुमारास त्याला अपघात झाला. समुद्रात २५ नॉटीकल मैलावर विमान कोसळलं असल्याचं सांगण्यात येतंय.

विमानातील एक अधिकारी आणि वैमानिकाचा शोध अजून लागलेला नाही, मात्र एका अधिकाऱ्याला वाचवण्यात यश आलं आहे.  या दोघांना शोधण्याचं काम  रात्रीपासून सुरू आहे. अपघात कारण अजून समजू शकलेलं नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.