'भारताच्या अवकाशीय सीमेत पोहोचण्याआधीच शत्रूंचा खात्मा करु'

लष्कर, हवाईदल आणि नौसेना कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीचा सामना करायला तयार आहे. हवाईदलाचे प्रमुख अरुप राह यांनी म्हटलं की, आज परिस्थिती काही वेगळी आहे. हवाईदल देशाच्या शत्रूंच्या कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यांशी निपटण्यासाठी सक्षम आहे. भारताच्या अवकाशीय सीमेत पोहोचण्याआधीच आम्ही शत्रूंचा खात्मा करु असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

Updated: Oct 5, 2016, 09:05 AM IST
'भारताच्या अवकाशीय सीमेत पोहोचण्याआधीच शत्रूंचा खात्मा करु' title=

नवी दिल्ली : लष्कर, हवाईदल आणि नौसेना कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीचा सामना करायला तयार आहे. हवाईदलाचे प्रमुख अरुप राह यांनी म्हटलं की, आज परिस्थिती काही वेगळी आहे. हवाईदल देशाच्या शत्रूंच्या कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यांशी निपटण्यासाठी सक्षम आहे. भारताच्या अवकाशीय सीमेत पोहोचण्याआधीच आम्ही शत्रूंचा खात्मा करु असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

चीफ एयर मार्शल राह यांनी म्हटलं की, देशातील सरकार जो ही निर्णय घेईल तो हवाईदल मान्य करेल आणि मजबूतीने साथ देईल. भारताने उरी हल्ल्यानंतर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावपूर्ण आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यासाठी तयार असल्याचं त्यांनी म्हटलंय.