इस्लामाबादमध्ये नवाज-स्वराज बैठकीदरम्यान तिरंगा गायब

भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज पाकिस्तान दौऱ्यावर गेल्या असताना दोन्ही देशांदरम्यान पुन्हा चर्चा सुरु झाल्याची चांगली बातमी असतानाच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासोबतची त्यांची बैठक पुन्हा एकदा वादात सापडली आहे. 

Updated: Dec 11, 2015, 03:45 PM IST
इस्लामाबादमध्ये नवाज-स्वराज बैठकीदरम्यान तिरंगा गायब title=

नवी दिल्ली : भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज पाकिस्तान दौऱ्यावर गेल्या असताना दोन्ही देशांदरम्यान पुन्हा चर्चा सुरु झाल्याची चांगली बातमी असतानाच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासोबतची त्यांची बैठक पुन्हा एकदा वादात सापडली आहे. 

सुषमा स्वराज आणि नवाज शरीफ यांच्यातील बैठकीदरम्यान खुर्चींच्या मागे पाकिस्तानचा झेंडा होता मात्र तिरंगा गायब होता. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो. तिरंगा गायब असल्याने नवा वाद पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे. 

दोन्ही नेत्यांची बैठक ज्या खोलीत झाली तेथील भिंतीवर पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांचा फोटो होता. नवाझ शरीफ यांच्यापाठी हिरव्या रंगाचा झेंडा होता आणि सुषमा स्वराज यांच्या पाठी पाकिस्तानचा झेंडा होता. जेव्हा दोन देशांच्या नेत्यांची भेट होते तेव्हा दोन्ही देशांचे झेंडे असतात. मात्र पाकिस्तानसोबतच्या बैठकीदरम्यान तिरंगा गायब असल्याने नेटकऱ्यांना सवाल उपस्थित केलाय. 

काही दिवसांपूर्वीच, पंतप्रधान नरेंद्र मोदी मलेशिया दौऱ्यावर गेले असताना आशियाई संमेलनात पंतप्रधान मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो यांच्या बैठकीदरम्यान उलटा तिरंग्याचे फोटो व्हायरल झाले होते. यावरुन विरोधकांसह सर्वच स्तरातून टीका करण्यात आली होती. 

दरम्यान, भारत आणि पाकिस्तानदरम्या द्विपक्षीय चर्चा नसल्याने तेथे तिरंगा नव्हता असे स्पष्टीकरण स्वराज यांनी दिलेय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.