तेलंगणा राज्यात वर्षपूर्तीचा जल्लोष

तेलंगणा या राज्याची निर्मिती होऊन आज १ वर्षं झालं. यानिमित्त आठवड्याभराच्या जल्लोषाची सुरूवात हैदराबादमध्ये झाली.

PTI | Updated: Jun 2, 2015, 05:03 PM IST
तेलंगणा राज्यात वर्षपूर्तीचा जल्लोष title=

हैदराबाद : तेलंगणा या राज्याची निर्मिती होऊन आज १ वर्षं झालं. यानिमित्त आठवड्याभराच्या जल्लोषाची सुरूवात हैदराबादमध्ये झाली.

पोलीस आणि विविध विभागांच्या संचलनानं आजचा तेलंगणा दिन सुरू झाला. राज्यातल्या तेलंगणा राष्ट्र समितीच्या सरकारनं २ ते ७ जूनदरम्यान सप्ताहाचं आयोजन केलंय.

राज्यातल्या १० जिल्ह्यांमध्ये राज्याची संस्कृती आणि तेलंगणाच्या लढ्याचा इतिहास यावर विविध कार्यक्रमांची रेलचेल असेल. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.