देशातील टॉप १० वकील आणि त्यांची फी

आंतरराष्ट्रीय कोर्टात सोमवारी कुलभूषण जाधव प्रकरणात सुनावणी सुरु झाली. भारत सरकारकडून वरिष्‍ठ वकील हरीश साळवे केस लढत आहेत. साळवे हे देशातील टॉप १० वकिलांमध्ये आहेत. आज आम्ही तुम्हाला देशातील टॉप १० वकिलांची माहिती देणार आहोत.

Updated: May 19, 2017, 04:55 PM IST
देशातील टॉप १० वकील आणि त्यांची फी title=

मुंबई : आंतरराष्ट्रीय कोर्टात सोमवारी कुलभूषण जाधव प्रकरणात सुनावणी सुरु झाली. भारत सरकारकडून वरिष्‍ठ वकील हरीश साळवे केस लढत आहेत. साळवे हे देशातील टॉप १० वकिलांमध्ये आहेत. आज आम्ही तुम्हाला देशातील टॉप १० वकिलांची माहिती देणार आहोत.

 नुसतं उभे राहण्याचे मिळतात २५ लाख रुपये 
 
देशातील अनेक वकिलांची फी ही लाखोंमध्ये आहे. एका हेअरींगसाठी 25 लाख रुपये देखील घेतात. लीगल आणि लॉयर्ससंबंधित प्रकरणावर काम करणाऱ्या लीगली इंडिया या संस्थेने काही दिवसांपूर्वी देशातील टॉप १० वकिलांची यादी जाहीर केली होती. 

1. राम जेठलमानी - 25 लाख रुपये प्रती हेयरिंग यांची फी आहे. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्येच्या आरोपींची यांनीच केस लढली होती. देशातील अनेक मोठ्या प्रकरणात यांनी केस लढवल्या आहेत.

2. फली नरीमन - 8 ते 15 लाख रुपये प्रती हेयरिंग यांची फी आहे. बीसीसीआई प्रमुखाचं नाव सूचवण्याच्या समितीमध्ये यांचा समावेश होतो. पण त्यांनी या समितीमध्ये सहभागी होण्यास नकार दिला होता. तमिळनाडू आणि कर्नाटक यांच्यातील कावेरी नदीच्या प्रकरणात देखील हेच वकील होते. 

3. के के वेणुगोपाल - 5 ते 15  लाख रुपये प्रती हेयरिंग यांची फी आहे. आधारला बंधनकारक करण्यासाठी सुप्रीम कोर्टात हेच वकील होते. लोढा कमिटीच्या शिफासशी लागू करण्यासाठीच्या प्रकरणात बीसीसीआयकडून हेच वकील होते.  

4. गोपाल सुब्रमण्यम - 5.5 ते 16.5 लाख रुपये प्रती हेयरिंग यांची फी आहे. ग्राहम स्टेंस मर्डर -जेसिका लाल मर्डर -पार्लियामेंटवर दहशतवादी हल्ला. अशा केसेस यांनी लढवल्या आहेत.

5. पी चिदंबरम - देशाते माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांची फी 6-15 लाख रुपए प्रती हेयरिंग आहे. कोल ब्लॉक एलोकेशनचा केस यांनी लढवली होती.

6. हरीश साळवे - 6 ते 15 लाख रुपये प्रती हेयरिंग यांची फी आहे. सलमान खान हिट अँड रन केसमध्ये यांनी सलमानला वाचवण्यात मोठी मदत केली होती. साळवे सॉलिसिटर जनरल देखील आहेत.

7. अभिषेक मनु सिंघवी - 6 ते 15 लाख रुपये प्रती हेयरिंग यांची फी आहे. कोल स्कॅममध्ये नवीन जिंदल यांच्याकडून त्यांनी केस लढवली होती.

8. सीए सुंदरम - 5.5 ते 16.5 लाख रुपये प्रती हेयरिंग यांची फी आहे. बीसीसीआयच्या अनेक केस त्यांनी लढवल्या आहेत. एस रंगराजन केसमध्ये फ्रीडम ऑफ स्पीच आणइ एक्सप्रेशन संबंधित मोठा निर्णय लागला होता.

9. सलमान खुर्शीद - 5 ते 11 लाख रुपये प्रती हेयरिंग यांची फी आहे. रेप केसमध्ये तहलकाचे संपादक तरुण तेजपाल यांची केस यांनी लढवली होती.

10. पराग त्रिपाठी -  5 ते 10 लाख रुपये प्रती हेयरिंग यांची फी आहे. डीएलएफ विरोधात सीसीआयकडून त्यांनी केस लढवली. आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांच्या देखील केस त्यांनी लढवल्या आहेत. पराग त्रिपाठी गे अॅडिशनल सॉलिसिटर जनरल होते.