आप `राजकारणाची आयटम गर्ल`

व्हॉट यंग इंडिया वॉन्ट्स पुस्तकाचा लेखक चेतन भगत आपवर नाराज आहे. बॉलिबूडमध्ये एखाद्या अभिनेत्रीला सिनेमे मिळेनासे झाले की लक्ष वेधून घेण्यासाठी ती आयटम गर्ल बनते. अशीच अवस्था आम आदमी पक्षाची झाली आहे. अस म्हणणं आहे तरूणाईचा लाडका लेखक चेतन भगतच. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यान हे मतप्रदर्शन केलयं.

Updated: Jan 22, 2014, 03:21 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, दिल्ली
व्हॉट यंग इंडिया वॉन्ट्स पुस्तकाचा लेखक चेतन भगत आपवर नाराज आहे. बॉलिबूडमध्ये एखाद्या अभिनेत्रीला सिनेमे मिळेनासे झाले की लक्ष वेधून घेण्यासाठी ती आयटम गर्ल बनते. अशीच अवस्था आम आदमी पक्षाची झाली आहे. अस म्हणणं आहे तरूणाईचा लाडका लेखक चेतन भगतच. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यान हे मतप्रदर्शन केलयं.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी आणि त्यांच्या कॅबिनेटने ज्या पध्दतीने आपल्या मागण्यांसाठी दिल्ली वेठीस धरली हे लाजीरवाणे आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपनं ही तयारी चालवली आहे. त्यांना देशाचे लक्ष वेधून घ्यायचे आहे अशी टीका चेतन भगतने आप संदर्भात केली आहे. दोन पोलीसांच्या निलंबनां व्यतिरिक्त आंदोलनाने काहीही साध्य झालेले नाही. राजधानी दिल्ली मात्र दोन दिवस ठप्प होती. जनजीवन विस्कळीत होतं. त्यामुळे हा प्रकार लाजीरवाणा असल्याच चेतन भगतच म्हणण आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.