जम्मू-काश्मीरमध्ये मशीदबाहेर स्फोट, १०जण जखमी

जम्मू-काश्मीरच्या शोपियां गावात आज सकाळी एका मशीदबाहेर झालेल्या स्फोटात १० जण जखमी झालेत. सकाळी नमाजच्या वेळी झालेल्या स्फोटानं साऱ्या गावाला हादरा बसलाय.

PTI | Updated: Aug 13, 2015, 09:35 AM IST
जम्मू-काश्मीरमध्ये मशीदबाहेर स्फोट, १०जण जखमी   title=

जम्मू : जम्मू-काश्मीरच्या शोपियां गावात आज सकाळी एका मशीदबाहेर झालेल्या स्फोटात १० जण जखमी झालेत. सकाळी नमाजच्या वेळी झालेल्या स्फोटानं साऱ्या गावाला हादरा बसलाय.

पहिल्या स्फोटानंतर आणखी एक हातबॉम्ब निकामी करण्यात आलाय.जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

दरम्यान आज जम्मूच्या पुंछ जिल्ह्यातल्या केजी सेक्टर, बीजी सेक्टर, पालनवाला सेक्टरमध्ये पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. 

रात्री उशिरापासून पाकनं याभागात जोरदार गोळीबार सुरू केलाय. त्याला भारतानं चोख प्रत्युत्तरही दिलंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.