जलप्रलयात अडकलेल्या भारताच्या स्वर्गाला केंद्राकडून हजार कोटींचं पॅकेज

पूरस्थितीमुळे जम्मू काश्मीर हे भारताचं नंदनवन सध्या धोक्यात आहे. पुरानं आतापर्यंत १६० पेक्षा जास्त जणांचे बळी घेतलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल जम्मू काश्मीरला भेट देत १००० कोटींचं पॅकेज जाहीर केलंय. 

Updated: Sep 8, 2014, 10:47 AM IST
जलप्रलयात अडकलेल्या भारताच्या स्वर्गाला केंद्राकडून हजार कोटींचं पॅकेज title=

श्रीनगर: पूरस्थितीमुळे जम्मू काश्मीर हे भारताचं नंदनवन सध्या धोक्यात आहे. पुरानं आतापर्यंत १६० पेक्षा जास्त जणांचे बळी घेतलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल जम्मू काश्मीरला भेट देत १००० कोटींचं पॅकेज जाहीर केलंय. 

तसंच पूरस्थिती राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित केली. 

सध्या जम्मूमधील पूर ओसरला असला तरी काश्मीरमध्ये मात्र पूरस्थिती अद्यापही कायम असून मदतकार्याला वेग आलाय. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूरस्थितीची हवाई पाहणी केली. त्यानंतर जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीबाबत चर्चा केली. 

राज्य आपत्कालीन निधीतून एक हजार कोटी रुपये काढण्याची परवानगी केंद्रानं यापूर्वीच दिली आहे. आता आणखी एक हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. त्याशिवाय पुनर्वसनासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असंही पंतप्रधानांनी स्पष्ट केलं आहे.

जम्मू-काश्मीरमधील जनतेला केंद्र सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. हे संकट फक्त तुमच्यावरील नाही, तर देशावरील आहे. या संकटाच्या काळात देश तुमच्या पाठीशी उभा राहील. त्यामुळंच काश्मीरमधील नागरिकांच्या मदतीसाठी इतर राज्यांनीही पुढं आलं पाहिजे, असं पंतप्रधानांनी म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.