लष्कराच्या जवानांना बदनाम करण्याचा प्रयत्न, मुलीने केला खुलासा

जम्मू-काश्‍मीरमधील हंडवाडा येथे शाळेतील विद्यार्थींनीची कथित छेडछाड केल्याचा आरोप करत आंदोलन करण्यात आले. मात्र, कोणत्याही लष्करी जवानाने आपली छेडछाड केलीच नाही. हा जवानांना बदनाम करण्याचा हा कट आहे, असा खुलासा संबंधित विद्यार्थिनीने केलाय.

PTI | Updated: Apr 13, 2016, 04:27 PM IST
लष्कराच्या जवानांना  बदनाम करण्याचा प्रयत्न, मुलीने केला खुलासा title=

श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमधील हंडवाडा येथे शाळेतील विद्यार्थींनीची कथित छेडछाड केल्याचा आरोप करत आंदोलन करण्यात आले. मात्र, कोणत्याही लष्करी जवानाने आपली छेडछाड केलीच नाही. हा जवानांना बदनाम करण्याचा हा कट आहे, असा खुलासा संबंधित विद्यार्थिनीने केलाय.

आपण शाळेमधून घरी जात असताना एका युवकाने आपली स्कूल बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी युवकाला विरोध केला. त्यावेळी त्याने मला एक थप्पड लगावली. पोलिसांनी जवळ येत मला चौकीत नेले. याघटनेनंतर संबंधित युवकाने मित्रांना गोळा करत गोंधळ घालण्यास सुरवात केली. कोणत्याही जवानाने आपली छेड काढलेली नाही. हे जवानांना बदनाम करण्याचा हा कट आहे, असे ती म्हणाली. 

कथित प्रकरणी एका विद्यार्थीनीची रस्त्यात जवानांनी छेड काढल्यामुळे नागरिकांनी आंदोलन केले होते. यावेळी नागरिकांनी जवानांवर दगडफेक केली. आंदोलकांना पांगविण्यासाठी जवानांनी केलेल्या गोळीबारात इक्‍बाल अहमद आणि नईम भट या दोघांचा मृत्यू झाला होता. आज एका जखमीचा उपचारादरम्यान निधन झाले. यामुळे या घटनेतील मृतांची संख्या तीन झालेय.