साक्षी, सिंधू, दीपा आणि जितूचा खेलरत्न पुरस्काराने सन्मान

क्रीडा क्षेत्रात दैदीप्यमान कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा आज राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. 

Updated: Aug 29, 2016, 01:29 PM IST
साक्षी, सिंधू, दीपा आणि जितूचा खेलरत्न पुरस्काराने सन्मान title=

नवी दिल्ली : क्रीडा क्षेत्रात दैदीप्यमान कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा आज राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. राष्ट्रपती भवनात हा क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. 

राष्ट्रीय खेलदिनाच्या निमित्ताने पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावणारी पी.व्ही.सिंधू, कांस्यपदक पटकावणारी कुस्तीपटू साक्षी मलिक, जिम्नॅस्ट दीपा कर्माकर आणि नेमाबाजपटू जितू राय यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला.

तर धावपटू ललिता बाबर, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेसह 15 जणांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. क्रिकेटर विराट कोहलीच प्रशिक्षक राज कुमार शर्मा आणि दीपाचे प्रशिक्षक बिश्वेश्वर नंदी यांचाही द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मान करण्यात आला. 

खेलरत्न पुरस्कार विजेते

साक्षी मलिक(कुस्तीपटू)
पी.व्ही.सिंधू(बॅडमिंटनपटू)
दीपा कर्माकर( जिम्नॅस्ट)
जितू राय (नेमबाजी)

अर्जुन पुरस्कार विजेते

ललिता बाबर(धावपटू)
अजिंक्य रहाणे(क्रिकेटपटू)
रजत चौहान(तिरंदाजी)
सौरव कोठारी(स्नूकर आणि बिलियर्डस)
शिवा थापा(बॉक्सिंग)
सुब्रतो पॉल(फुटबॉल)
राणी(हॉकी महिला संघ)
व्ही.आर.रघुनाथ(हॉकी पुरुष संघ)
गुरप्रीत सिंग(नेमबाजी)
अपूर्वी चंडेला(नेमबाजी)
सौम्यजित घोष(टेबल टेनिस)
विनेश फोगट(कुस्ती)
संदीप सिंग मान(पॅरा-अॅथलेटिक्स)
विरेंदर सिंग(कुस्ती)

ध्यानचंद पुरस्कार विजेते

राजेंद्र शेळके(रोईंग)
सेल्वानूस डुंग डुंग(हॉकी)
सत्ती गीता(अॅथलेटिक्स)

द्रोणाचार्य पुरस्कार विजेते

नागपुरी रमेश(अॅथलेटिक्स)
सागर माल दयाल(बॉक्सिंग)
राज कुमार शर्मा(क्रिकेट)
बिश्वेश्वर नंदी(जिम्नॅस्टिक्स)
एस. प्रदीप कुमार(स्विमिंग)
महाबीर सिंग(कुस्ती)