सुरजकुंड : कर्णधार नरेंद्र मोदींनी पहिल्याच कसोटी सामन्यात त्रिशतक ठोकलं, असे गौरवोद्गार भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी मोदींविषयी काढले आहेत.
भाजपच्या नवनिर्वाचित खासदारांसाठी सुरजकुंडमध्ये प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. दोन दिवसांच्या या शिबिराचा समारोप लालकृष्ण अडवाणींच्या भाषणानं झालं. त्यावेळी अडवाणींनी मोदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या या विजयाचं गुणगान केलं.
लोकसभेच्या निव़डणुकीत एवढ्या मोठ्या संख्येनं भाजपचे खासदार निवडून येतील असं वाटलं नव्हतं. पण मोदींनी पक्षासाठी विजयश्री खेचून आणली अशा शब्दात मोदींबद्दल गौरवोद्गार काढले.
विशेष म्हणजे लोकसभा निडणुकीच्या निकालाच्या दिवशी लालकृष्ण अडवाणींनी हा विजय मोदींचा आहे की पक्षाचा हे तपासावं लागेल असं विधान करून वाद ओढावून घेतला होता. पण लालकृष्ण अडवाणींनी आज केलेल्या स्तुतीमुळे मोदींबद्दलचा त्यांच्या मनातला आकस कमी झाल्याचं दिसून आलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.