VIDEO : लालूंच्या नववी पास मुलाला नीट मंत्रिपदाची शपथही घेता आली नाही!

आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यानं शपथ घेतानाच मोठी चूक केलीय. 

Updated: Nov 20, 2015, 07:17 PM IST
VIDEO : लालूंच्या नववी पास मुलाला नीट मंत्रिपदाची शपथही घेता आली नाही! title=

पाटणा : आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यानं शपथ घेतानाच मोठी चूक केलीय. 

तेज प्रताप यानं पहिल्यांदा 'अपेक्षित' असं म्हणण्याऐवजी 'उपेक्षित' असा उच्चार केला तसंच 'तेव्हा'च्या ऐवजी 'जेव्हा' असा उल्लेख त्यांनी केला.

मंचावरच त्यांची ही चूक सुधारत राज्यपाल रामनाथ कोविंद यांनी तेज प्रतापला गोपनीयतेची शपथ दिली. यानंतर त्यांना पुन्हा एकदा शपथ ग्रहण वाचण्यासाठी सांगण्यात आलं. त्यानंतर तेजप्रतापनं मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची पुन्हा एकदा शपथ घेतली. तेजप्रतापनं नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर शपथ घेतली. 

तेज प्रताप यादव हा लालू यादव यांचा सर्वांत मोठा मुलगा आहे. नववी पास असलेले तेजप्रताप महुआ मतदारसंघातून निवडून आलाय आणि पहिल्यांदाच विधानसभेत पोहचलाय. लालूप्रसाद यांची दोन मुलं तेजस्वी आणि तेजप्रताप दोघंही पहिल्यांदाच निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरलेत आणि दोघंही पहिल्यांदाच आमदार बनलेत. परंतु, तेजस्वी यादव यांना लालूंचा उत्तराधिकारी मानलं जातंय. 

शुक्रवारी,  नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केलीय. सोबतच राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या दोन मुलांसहीत एकूण २८ मंत्र्यांनी शपथ ग्रहण केलीय. 

व्हिडिओ पाहा :-

 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.