मोदींचे ११ महिन्यात १५ देशांचे दौरे

भारताचे १५वे  पंतप्रधान म्हणून जनतेने २६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदी यांना सर्वमताने कौल दिला. नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदावर विराजमान झाल्यापासून ११ महिन्यात १५ देशांचे दौरे केले आहे. कालच मोदी फ्रांन्स, जर्मनी आणि कॅनडाचा आठ दिवसांचा दौरा करून भारतात पोहचले आहेत.

Updated: Apr 19, 2015, 01:36 PM IST
मोदींचे ११ महिन्यात १५ देशांचे दौरे title=

नवी दिल्ली: भारताचे १५वे  पंतप्रधान म्हणून जनतेने २६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदी यांना सर्वमताने कौल दिला. नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदावर विराजमान झाल्यापासून ११ महिन्यात १५ देशांचे दौरे केले आहे. कालच मोदी फ्रांन्स, जर्मनी आणि कॅनडाचा आठ दिवसांचा दौरा करून भारतात पोहचले आहेत.

एक नजर मोदींच्या विदेश दौऱ्यांवर: 

1) भूतान 
   भेट दिलेली ठिकाणे : पारो, थिंपू
   दिनांक : 16 ते 17 जुन

2) ब्राझील
   भेट दिलेली ठिकाणे : फोर्तलेझा, ब्राझिलिया
   दिनांक : 13 ते 16 जुन

3) नेपाळ
  भेट दिलेली ठिकाणे : काठमांडु
  दिनांक : 3 ते 4 ऑगस्ट

4) जापान
   भेट दिलेली ठिकाणे : क्योटो, टोकियो
   दिनांक : 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर

5) अमेरिका
   भेट दिलेली ठिकाणे : न्यूयॉर्क, वॉशिंग्टन
   दिनांक : 26 ते 30 सप्टेंबर

6) म्यानमार
   भेट दिलेली ठिकाणे : नेपिडो
   दिनांक : 11 ते 13 नोव्हेंबर

7) ऑस्ट्रेलिया 
   भेट दिलेली ठिकाणे : ब्रिस्बेन, कॅनबेरा, मेलबर्न, सिडनी
   दिनांक : 14 ते 18 नोव्हेंबर

8) फिजी
   भेट दिलेली ठिकाणे : सुवा
   दिनांक : 19 नोव्हेंबर

9) नेपाळ
  भेट दिलेली ठिकाणे : काठमांडू
  दिनांक : 25 ते 27 नोव्हेंबर

10) सेशल्स
  भेट दिलेली ठिकाणे : व्हिक्टोरिया
  दिनांक : 10 ते 11 मार्च

11) मॉरिशस
  भेट दिलेली ठिकाणे : पोर्ट लुईस
  दिनांक : 11 ते 13 मार्च

12) श्रीलंका
  भेट दिलेली ठिकाणे : कोलंबो, जाफना
  दिनांक : 13 ते 14 मार्च 

13) सिंगापुर
  भेट दिलेली ठिकाणे : सिंगापूर
  दिनांक : 29 मार्च 

14) फ्रान्स
  भेट दिलेली ठिकाणे : पॅरिस, तुलू
  दिनांक : 9 ते 12 एप्रिल

15) जर्मनी
  भेट दिलेली ठिकाणे : बर्लिन, हानोफर
  दिनांक : 12 ते 14 एप्रिल

16) कॅनडा
  भेट दिलेली ठिकाणे : ऑटवा, टोरोंटो, वॅनकूवर
  दिनांक : 14 ते 16 एप्रिल

मोदींचे नियोजित दौरे:
चीन, मंगोलिया, साऊथ कोरिया, रशिया, तुर्कमेनिस्तान, तुर्की, रशिया,  सिंगापूर 
  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.