मुंबई : बचपन बचाव आंदोलन आणि कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाऊंडेशन यांनी मिळून, सोशल मीडियावर लहान मुलांच्या लैंगिक शोषणाविरोधात कॅम्पेन सुरू केलं आहे.
फुलस्टॉप असं कॅम्पेनचं नाव आहे देशात दर तासाला २ मुलांचं लैंगिक शोषण केलं जातं. जवळ-जवळ लैंगिक शोषणाची २० हजार प्रकरणं समोर आली आहेत. काही प्रकरणांचा तर समावेशही होत नाही, कारण ती प्रकरणं समोर येतंच नाहीत.
फुलस्टॉप कॅम्पेनच्या माध्यमातून, पालकांना जागृत करण्याचा प्रयत्न होत आहे, की आपली मुलं निराश किंवा बोलणं बंद करत असतील, कमी करत असतील तर त्यांना समजून घ्या. अधिक जाणून घेण्यासाठी फुलस्टॉपची वेबसाईट पाहणे गरजेचे आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.