एकत्र राहणे म्हणजेच `लिव्ह इन` नव्हे : कोर्ट

लिव्ह इन म्हणजे फक्त एकत्र राहणे नसून त्यात जोडीदारासाठी जबाबदारीची भावनाही गरजेची असल्याचे मत दिल्ली सेशन कोर्टाने व्यक्त केले आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Dec 6, 2013, 08:59 AM IST

www.24taas.com, पीटीआय, नवी दिल्ली
लिव्ह इन म्हणजे फक्त एकत्र राहणे नसून त्यात जोडीदारासाठी जबाबदारीची भावनाही गरजेची असल्याचे मत दिल्ली सेशन कोर्टाने व्यक्त केले आहे.
लग्नाचे आमिष दाखवून जोडीदारावर सातत्याने बलात्कार केल्याच्या प्रकरणी कोर्टाने काल हरिमोहन शर्मा या तरुणाला दोषी ठरविले आहे. एखादी महिला अशा प्रकारचे संबंध जेव्हा स्वीकारते तेव्हा तिच्या मनात लग्नाशिवाय दुसरा विचार नसतो; परंतु हे संबंध तुटल्यास त्या महिलेला सावरणे अशक्ये होते, अशी टिप्पणीही कोर्टाने केली.
या संबंधातून गरोदर राहिलेल्या मुलीने २०११मध्ये पोलिसांकडे तक्रार नोंदविली होती. घरच्या मंडळींना प्रेमप्रकरण पसंत नसल्यामुळे संबंध संपवत असल्याचे सांगून शर्मा याने या मुलीला झिडकारले होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.