सोने १९० रुपये स्वस्त, चांदीत ३०० रुपयांची तेजी

वैश्विक बाजारात मंदीमुळे स्थानिक दागिने विक्रेत्यांची मागणी कमी झाल्याने दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्यात लगोपाठ दुसऱ्या दिवशी घट दिसून आली. सोन्याची किंमत १९० रुपयांनी घटून २६ हजार ८१० प्रति ग्रॅम झाली आहे. 

Updated: Sep 3, 2015, 07:09 PM IST
सोने १९० रुपये स्वस्त, चांदीत ३०० रुपयांची तेजी  title=

नवी दिल्ली : वैश्विक बाजारात मंदीमुळे स्थानिक दागिने विक्रेत्यांची मागणी कमी झाल्याने दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्यात लगोपाठ दुसऱ्या दिवशी घट दिसून आली. सोन्याची किंमत १९० रुपयांनी घटून २६ हजार ८१० प्रति ग्रॅम झाली आहे. 

औद्योगिक स्तरावर आणि शिक्का तयार करणाऱ्यांनी चांदीची मागणी वाढवली त्यामुळे चांदीत ३०० रुपये वाढ झाली आणि चांदी ३५,३०० प्रति किलो पर्यंत पोहचली आहे. बाजारातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंदीमुळे सोन्याच्या दरात घट आली. 

सिंगापूरमध्ये सोन्यात ०.१ टक्के घट दिसून आली. प्रति औंस सोन्याची किंमत ११३२ रूपये होती. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.