पश्चिम बंगालचं नाव बदलणार ममता सरकार

देशात हायकोर्टाचे नाव बदलण्यावरुन चर्चा सुरु असतानाच आता एका राज्याचं नाव बदलण्यासाठी देखील प्रयत्न सुरु झाले आहेत. मुख्यमंत्री  ममता बॅनर्जी यांचं सरकार पश्चिम बंगालचं नाव बदलण्याच्या तयारीत आहे.

Updated: Aug 2, 2016, 05:24 PM IST
पश्चिम बंगालचं नाव बदलणार ममता सरकार title=

कोलकाता : देशात हायकोर्टाचे नाव बदलण्यावरुन चर्चा सुरु असतानाच आता एका राज्याचं नाव बदलण्यासाठी देखील प्रयत्न सुरु झाले आहेत. मुख्यमंत्री  ममता बॅनर्जी यांचं सरकार पश्चिम बंगालचं नाव बदलण्याच्या तयारीत आहे.

टीएमसीचे मंत्री पार्था चटर्जींनी म्हटलं की, पश्चिम बंगालचं नाव बदलून आता 'बांग्ला' किंवा 'बोंगो' केलं जाणार आहे. तर इंग्रजीमध्ये 'Bengal'असं नाव असणार आहे. पक्ष यासाठी लवकरच विशेष अधिवेशन बोलवणार आहे. ममतांच्या कॅबिनेटने यावर शिक्का मोतर्ब केला असल्याची देखील चर्चा आहे.